Home राष्ट्रीय अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू?

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू?

0
62

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, दाऊद आणि त्याच्या पत्नीला ‘कोरोना’चा संसर्ग झाल्याचे वृत्त नुकतेच समोर आले होते.

 

 

न्यूज एक्सने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, करोनामुळे दाऊदचा कराचीत मृत्यू झाला आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. १९९३ साली मुंबईत झालेल्या भीषण मालिका बॉम्बस्फोट प्रकरणी फरार असलेला गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाचा संसर्ग झाल्याने शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त होते. मात्र आता कोरोनामुळे दाऊदचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. दाऊदला कराचीमधील लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होत, तिथेच त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. पाकिस्तानकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, याआधी देखील दाऊद आजारी असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण पाकिस्तानकडून याची कोणतीच माहिती दिली गेली नव्हती.


Protected Content

Play sound