इस्लामाबाद (वृत्तसंस्था) । भारतीय हवाई दलाने मंगळवार पासून सुरू केलेल्या पाकिस्थानमधील बालाकोट इथे केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्थानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अणुविषयक समितीची तातडीची बोलाविली आहे. पाकिस्तानचे अणुविषयक धोरण ठरविण्याची, संशोधनासंबंधी निर्णय घेण्याची व नियंत्रणाची संपूर्ण जबाबदारी नॅशनल कमांड ऑथॉरिटीकडं (एनसीए) आहे. भारताच्या एअर स्ट्राइकनंतर मंगळवारी पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली होती.
या बैठकीत काही महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. भारताशी तणाव निर्माण होताच पाकिस्तानकडून नेहमीच अणुहल्ल्याच्या वल्गना केल्या जातात. आताही पाककडून असाच दबावाचा प्रयत्न केला जात आहे. पुलवामा इथे झालेल्या हल्ल्यात पाकपुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा हात असल्याचे स्पष्ट झाल्याने भारताने मंगळवारी पाकमधील बालाकोट येथील ‘जैश’च्या तळांवर हल्ला केला. त्यात सुमारे ३५० दहशतवादी मारले गेले.