संरक्षण खरेदीला तातडीची 2700 कोटींची मंजूरी

68182678

68182678

नवी दिल्ली – भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय केंद्र सरकारने तातडीच्या संरक्षण खरेदी करारासाठी २७०० कोटींची मान्यता दिली आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण खरेदी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नव्या करारामुळे भारतीय नौदलाच्या ताफ्यात तीन जहाजांची भर पडणार आहे. ही जहाजे नौदलाच्या अधिकाऱ्यांना सागरी सुरक्षाविषयक प्रशिक्षण देण्यासाठी वापरात आणली जाणार आहेत. नागरी सहाय्य, आपत्ती व्यवस्थापन, बचाव व शोधकार्यासह अन्य विविध कामे करण्याची या जहाजांची क्षमता असल्याची माहिती विश्वनिय सुत्रांकडून मिळाली आहे.

Add Comment

Protected Content