यावल प्रतिनिधी । तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळून आला असतांनाच आज दोन कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
कोरोनाच्या संसर्गाने शहरात व तालुक्यात कहर केला असुन आज बाधीतांमधुन दोन जणांचा उपचारा दरम्यान जळगाव येथे मृत्यु झाला आहे. शहरातील बाबुजीपुरा परिसरात राहणारे एका६० वर्षीय नागरीकांचा आज ५ते ५,३० वाजेच्या दरम्यान जळगाव येथील कोवीड सेन्टर मध्ये मृत्यु झाला आहे. तर यावल येथील राहणार्या ६० वर्षीय व्यक्तिस दिनांक २८ मे रोजी उपचारासाठी जळगाव येथे दाखल करण्यात आले होते. आज दिनांक ३१ मे रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल हा दुपारीच पॉझीटीव्ह असल्याचे आला होता. आज सायंकाळच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. यामुळे तालुक्यातील कोरोना बाधीतांच्या मृत्यूची संख्या चारवर गेली आहे. कोरोना बाधीतांच्या वाढत्या मृत्युमुळे तालुक्यात चिंतेचे सावट पसरले आहे.