ऑटो इंडस्ट्रीवर कोरोनाचा कहर : ह्युंदाईने थांबवले उत्पादन

Corona Virus

 

सोल वृत्तसंस्था । कोरोना विषाणूच्या (Corona Virus) संसर्गामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. या उद्भवलेल्या आपत्तीचा परिणाम अनेक उद्योगधंद्यावरही होत आहे. शुक्रवारी जगातील सर्वाधिक उत्पादन क्षमता असणारी ‘ह्युंदाई’ कार फॅक्टरी तात्पुरती बंद झाली. दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल कंपनी ह्युंदाईने (Hyundai) सध्या आपल्या सर्वात मोठ्या उलासन प्लांटचे काम बंद केले आहे.

चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे औद्योगिक उत्पादनावर परिणाम होत आहे. याच कारणामुळे सध्या बाजारात ऑटो पार्ट्सची कमतरता आहे. ह्युंदाई या प्लांटमध्ये वर्षाकाठी 1.4 दशलक्ष वाहने तयार करण्याची क्षमता आहे. ही कंपनी समुद्रकिनारी आहे, त्यामुळे सहजपणे घटक आयात आणि निर्यात केले जाऊ शकतात. मात्र आता हा प्लांट बंद करण्यात आला आहे.

ह्युंदाईचा हा प्रकल्प सोलच्या किनारी भागातील उलसान येथे आहे. त्यामुळे वाहनांच्या सुट्या भागांची मोठ्या प्रमाणावर आयात आणि निर्यात करणे सोपे जाते. मात्र, चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने तेथील कारखाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे चीनमधून आयात होणारे वाहनांचे सुटे भाग मिळणे दुर्लभ झाले आहे. त्यामुळे दक्षिण कोरियातील ह्युंदाईसह अन्य कंपन्यांनी वाहनांची निर्मिती थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकट्या दक्षिण कोरियातच जवळपास २५ हजार कामगारांना सुट्टीवर पाठवण्यात आले आहे. कामगारांना सुट्टीवर पाठवण्यात आल्याने काम बंद राहणार असून, कामगारांच्या वेतनात कपातही करण्यात येणार आहे.

अर्थतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार करोना विषाणूमुळे चीनच्या बाहेर बंद पडलेला हा पहिलाच कारखाना ठरला आहे. बंद पडलेल्या कारखान्यामुळे ह्युंदाईचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी पाच दिवस बंद राहिल्यास किमान ५० कोटी डॉलरचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content