एनआरएमयुच्‍या कर्मचारी जागरूकता सप्‍ताहात सहभागी व्‍हा ; वेणु नायर यांचे आवाहन

भुसावळ, प्रतिनिधी | ऑल इंडिया रेल्‍वे मेंस फेडरेशनच्‍या आवाहननुसार एनआरएमयु अर्थात नॅशनल रेल्‍वे मजदूर युनियनतर्फे दि. १ ते ६ जूनपर्यंत रेल्‍वे कर्मचा-यांच्‍या भेटी घेऊन जागरूकता सप्‍ताह राबवण्‍यात येणार आहे. तर ८ जून रोजी काळ्‍या पट्‍ट्‍या बांधून विरोध दिवस पाळणार आहे. यात रेल्‍वे कर्मचा-यांनी सहभागी व्‍हावे असे आवाहन एनआरएमयु मध्‍य व कोकण रेल्‍वेचे महामंत्री वेणु.पी.नायर यांनी केले आहे.

विरोध सप्‍ताहाचे मुद्‍दे रेल्‍वे कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ते बंद करून अन्‍यायकारक कर्मचाऱ्यांचे शोषण,कामगार कायद्‍यात पतनकारी परिवर्तन व त्‍यांच्‍या अधिकारांवर हल्‍ला. खासगीकरण व निगमीकरण हे रेल्‍वे व जनविरोधी, कर्मचारी कपात, काम जास्‍त असतांना कर्मचारी निम्‍मे ठेवणे या विरूध्‍द हा सप्‍ताह राबवून जनजागृती केली जाणार आहे. युनियनच्‍या बॅनरखाली कर्मचा-यांनी दिलेला लढा व बलीदानाचे फलीत म्‍हणुन महागाई भत्ते व अन्‍य हक्‍काच्‍या सुविधा कर्मचा-यांना मिळत असून त्‍यांना धक्‍का लावण्‍याचा प्रयत्‍न होत असल्‍याने भुसावळ विभागातील कर्मचा-यांनी आपले अधिकार व सुविधा टिकवून ठेवण्‍यासाठी भुसावळ विभागातील सर्व कर्मचा-यांनी जागरूकता सप्‍ताहात सहभागी व्‍हावे व रेल्‍वे प्रशासनाचा विरोध करावा असे आवाहन एनआरएमयु मध्‍य व कोकण रेल्‍वेचे महामंत्री वेणु.पी.नायर, भुसावळ विभागीय सचिव आर.आर.निकम व विभागीय अध्‍यक्ष पुष्‍पेंद्र कापडे आदींनी केले आहे.

Protected Content