प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व नागरिकांचे स्वाॅब घ्या ; शिशिर जावळे

 

भुसावळ, प्रतिनिधी | शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी प्रोफेसर कॉलनी फलक नगरात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने शनिवारपर्यंत शहरात मृतांची संख्या २४ झाली आहे. रुग्ण आढळून आलेला परिसर अद्यापही सील करण्यात आलेला नसल्याने तो सील करून प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व नागरिकांचे स्वाॅब घ्यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी केली आहे.

प्रभाग २२ मधील प्रोफेसर कॉलनीतील वृद्ध मयत झालेला आहे. शनिवारी आलेल्या अहवालात याच प्रभागातील आनंदनगर, प्रोफेसर कॉलनी, कस्तुरी नगर, भागातील पॉझिटिव्ह यांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रभागांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेला आहे. या परिसरातील या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना प्रशासनाने कॉरनटाईन केलेले आहे. या प्रभावित भागातील काही परिसर मात्र आज दिनांक ३१ मे दुपारपर्यंत सुद्धा सील करण्यात आलेला नाही.याप्रभागातील सर्व नागरिकांची त्वरित युद्धपातळीवर आरोग्य तपासणी करून त्यांचे सर्वांचे स्वॅब घेण्यात यावे. प्रभावित परिसर त्वरित सील करण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर दिनकर जावळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे , भुसावळ मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्याकडे केली आहे.

Protected Content