रावेरात शिवा इव्हेंटतर्फे ‘आर्सेनिक अल्बम-३०’ औषधाचे मोफत वाटप

रावेर प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी शहरातील शिवा इव्हेंटच्या वतीने ‘आर्सेनिक अल्बम-३०’ औषधाचे मोफत वाटप करण्यात येत आहे.

आयुष्य मंत्रालयातर्फे प्रमाणित ‘आर्सेनिकम अल्बम-३०’ या औषधीचा रावेर शहरात तुटवडा होत होता, तसेच काही लोक जास्त किंमतीने औषध विकत होते. हे लक्षात घेवून शहरातील शिवा इव्हेन्टचे संचालक गणेश जाधव यांनी हे औषध होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून १५०० बॉटल बनवून घेतले असून रावेरकरांसाठी सकाळी ११ वाजता डॉ. हेडगेवार चौकात, सौरभ क्रिएशन येथे या औषधाचे मोफत वाटप करण्यात आले. रावेर पोलीस स्टेशन येथे ६८ बॉटल वाटप केले व अजून काही दिवसात औषधी उपलब्ध झाल्यावर मोफत वितरण हे सुरूच ठेवणार आहे. यावेळी शिवा इव्हेंटचे अध्यक्ष गणेश महाजन, तुषार कानडे, एडिट फर्स्टचे संचालक चेतन परदेशी, रावेर पो.स्टे.चे निलेश लोहार, श्रीराम फाउंडेशनचे संतोष महाजन, प्रवीण महाजन, हेमंत बडगुजर, सौरभ चौधरी व योगेश पवार आदी परिश्रम घेत आहे.

Protected Content