Home आरोग्य प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांनी केली रावेर कोविड सेंटरची पाहणी

प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांनी केली रावेर कोविड सेंटरची पाहणी

0
43


 

रावेर, प्रतिनिधी | आज प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी रावेर कोविड सेंटरला भेट देऊन जेवण,स्वच्छता, व इतर सोयी-सुविधांची पाहणी केली. येथे असलेल्या नागरीकांची देखिल त्यांनी संवाद साधला.

रावेर तालुक्यात मागिल आठ-दहा दिवसात कोरोना व्हायरसचा स्प्रेड होण्याचा प्रमाण वाढले असून या दरम्यान तब्बल आठ जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभुमीवर प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले आज रावेर भागात आले असून त्यांनी कोविड सेंटरला भेट दिली व त्यानंतर रावेर तहसिला जाऊन आरोग्य,नगर पालिका,प्रशासनाला खबरदारी म्हणून योग्य त्या सूचना दिल्या आहे.यावेळी त्यांच्या सोबत तहसिलदार उषाराणी देवगुणे, सिईओ रविंद्र लांडे, देखिल उपस्थित होते. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सर्व विभागांना योग्य त्या सूचना करणार असून नागरिकांना देखिल त्यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे अवाहन केले आहे.


Protected Content

Play sound