धरणगावात पुन्हा तीन कोराना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील तीन जणांना कोराना असल्याचा अहवाल नुकताच तालुका प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, आढळून आलेल्या रूग्णांच्या वास्तव्यास असलेला परिसर सील करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

कोरोनाबाधित तीन रूग्णांपैकी एक शहरातील मोठा माळी वाडा, बालाजी मंदीर परिसरातील दुसरा असून हा परिसर सील करण्याचे काम सुरू आहे. मात्र तिसरा रूग्णाचे नेमके वास्तव्य कुठे आहे हे समजू न शकल्याने प्रशासनाकडून याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. धरणगाव शहरात तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान, दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर शहरात दोन दिवसापूर्वीही तीन रुग्ण आढळले होते.

Protected Content