प्रशासनामधील समन्वयाच्या अभावाने कोराना रूग्णांमध्ये वाढ- माजी मंत्री खडसे

रावेर (शालिक महाजन) । प्रशासनाचा एकमेकांमध्ये समन्वय नाही, कोरोना संदर्भात योग्य पाऊल उचलले गेले पाहिजे होते, ते उचलले गेली नाही. परिणामी कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय, अशी माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ‘लाईव्ह ट्रेन्डस न्यूज’शी बोलतांना सांगितले.

प्रयोगशाळा नसल्यामुळे कोरोना अहवाल लवकर मिळत नाही, रिपोर्ट येईपर्यंत कोरोनाबाधित रूग्ण नातेवाईक व इतर गावातील नागरिकांच्या संपर्कात आल्याने त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. एखाद्या रूग्णाचे स्वॅब घेतल्यानंतर त्याला घरी न पाठविता रूग्णालयातच क्वारंटाईन करावे, जेणेकरून पुढे इतर जणांच्या संपर्कात येणार नाही. मात्र प्रशासनाच्या संबंधित विभागातील कर्मचारी एकमेकांमध्ये समन्वय नसल्याने रूग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान नागरिकांनीही कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेवून खबरदारी घेतली पाहिजे. नागरिकांचे बाहेर पडण्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त आहे, असे दृष्य सर्वत्र पहावयास मिळत आहे. संशयित कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्काराला जाण्याची काहीही गरज नाही. पण नागरिक अंत्यसंस्काराला जाता आणि नंतर मयताचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला तर मात्र सर्वांची धावपळ होते. यात प्रशासनालाही कसरत करावी लागते. नागरिकांनी लॉकडाऊन नियम आणि कोरोना विषाणूचे गांभीर्य लक्षात ठेवून घरी सुरक्षित रहा असे आवाहन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले आहे.

Protected Content