रावेर आगारातून मालवाहतूकीची सुविधा ; आगार प्रमुख बेंडकुळे

रावेर, प्रतिनिधी । एसटी महामंडळातर्फे प्रवासी वाहतुकीबरोबर आता माल वाहतूकही करण्यात येणार आहे. एस.टी. महामंडळाच्या येथील आगारातून संपूर्ण राज्यात माल वाहतुकीची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती आगार प्रमुख बेंडकुळे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यानंतर संपूर्ण राज्यात एसटीची प्रवासी सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे या दीड – दोन महिन्याच्या काळात महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे. प्रवासी वाहतुकीत सरस असलेल्या एसटी महामंडळाने आता मालाच्या वाहतुकीलाही सुरुवात केली आहे. येथील आगारातून राज्यभरात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये धान्य, फळे, भाजीपाला व इतर कुठलाही मालाची वाहतूक करण्यात येणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे. यासाठी तालुक्यातून राज्यात माल पाठवणाऱ्या नागरिकांनी आगार प्रमुख यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आगार प्रमुख नीलेश बेंडकुळे यांनी केले आहे.

Protected Content