सावदा प्रतिनिधी ।सावदा रेल्वे स्टेशन जवळील गाते ता. रावेर गावातील ५५ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. गाते गावातील परीसर तालुका प्रशासनाकडून सील करण्याचे काम सुरू होते. या वृत्ताला तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दुजोरा दिला आहे.
तालुका प्रशासनाकडून मिळालेली माहिती अशी की, सावदा गावापासून जवळ असलेल्या गाते गावात ५५ वर्षीय महिलेला चार दिवसांपुर्वी कोरोनाची काही लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी जळगाव येथील जिल्हा कोविड रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. संबंधित महिलेचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज सकाळी प्रशासनाला महिलेला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आला आहे. गाते गावात राहणाऱ्या महिलेल्या नातेवाईकांना क्वारंटाईन करत असून संपुर्ण परिसत सील करण्याचे काम तालुका प्रशासनातर्फे करण्यात येत असल्याची तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजशी बोलतांना सांगितले.