Home आरोग्य धरणगावात विद्युत तार अंगावर पडल्याने सहा म्हशींचा तडफडून मृत्यू (व्हिडीओ)

धरणगावात विद्युत तार अंगावर पडल्याने सहा म्हशींचा तडफडून मृत्यू (व्हिडीओ)


धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील एमईसीबी कार्यालयासमोर आज सकाळी विद्युत तार अंगावर पडल्याने सहा म्हशी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान, तुटलेली विद्युत तार मागील काही महिन्यात दोन ते तीन वेळेस अशाच पद्धतीने तुटून खाली पडली असल्याची देखील माहिती स्थानिकांनी दिली.

 

या संदर्भात अधिक असे की, शहरातील एमईसीबी कार्यालयासमोर रामदास गंगाराम निळे यांचा म्हशींचा गोठा आहे. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास गोठ्यावर अचानक विद्युत तार कोसळली. गोठा मोकळा असल्यामुळे तार थेट म्हशींच्या अंगावर पडली. त्यामुळे सहाही म्हशींचा तडफडून मृत्यू झाला. मयत म्हशींमध्ये दोन म्हशी गाभण असल्याची माहिती श्री.निळे यांनी दिली. या दुर्घटनेत श्री. निळे यांचे साधारण सहा लाखाचे नुकसान झाले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, घटनास्थळी पोलीस पंचनामा करीत होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3023035534443209/


Protected Content

Play sound