शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन दिवस ओपीडी बंद

 

जळगाव, प्रतिनिधी ।  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दि. २५ व २७ रोजी कोरोनाव्यतिरिक्त आजारांची नियमित ओपीडी तपासणी बंद राहणार असल्याची जिल्ह्यातील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

रुग्णालयात गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांच्या सहकार्याने कोरोना व्यतिरिक्त आजारांची तपासणी करण्यासाठी ओपीडी सुरु झाली आहे. आठवड्याभरात १ हजारपेक्षा अधिक नागरिकांनी तपासणी केली आहे. शुक्रवार दि. २५ रोजी नाताळ सण व दि. २७ रोजी रविवारचा दिवस असल्याने ओपीडी बंद राहणार आहे. तातडीच्या उपचारांसाठी मात्र नियमित वैद्यकीय सेवा सुरु राहतील. तसेच शनिवारी २६ रोजी नियमित ओपीडी सुरु राहील अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांनी दिली आहे.

Protected Content