मुंबई (वृत्तसंस्था) आज एका दिवसात तब्बल 116 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे पोलीस दलात चिंतेचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 2211 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
गुरुवारी दिवसभरात 131 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला होता. गेल्या सहा दिवसात चारशेहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तापर्यंत एकूण 249 पोलीस अधिकाऱ्यांना आणि 1962 कर्मचाऱ्यांना कोरोनाने ग्रासले आहे. तर कालच्या दिवसात तीन कोरोनाग्रस्त पोलिसांना प्राण गमवावे लागले. आतापर्यंत 25 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 165 अधिकारी आणि 1051 कर्मचारी अशा एकूण 1216 पोलिसात ही लक्षणं दिसून येत आहेत.