जळगावात मध्यरात्री घरफोडी; दीड लाखाचे दागीने लंपास

जळगाव प्रतिनिधी । बाहेरून कुलूप लावलेले घर फोडून घरातील कपाटात ठेवलेले १ लाख ४० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने चोरीस गेल्या आज सकाळी शहरातील जिवन मोती सोसायटीत उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुकेश बाबुराव कासारे (वय-५९) रा. जिवन मोती सोसायटी जळगाव हे पत्नी व मुलगला चेतन सह राहतात. उन्हाळाच्या उकाळ्याने गरम होत असल्याने मुलगा आणि पत्नी हे २८ मे रोजी रात्री गच्चीवर झोपले तर मुकेश कासार हे घरातील हॉलमध्ये झोपले असतांना मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरीतील बेडरूम मधील गोदरेज कपाटात ठेवेले १ लाख ४० हजार रूपयांचे दागीने चोरून नेले. मुकेश यांची पत्नी सुरेखा ह्या सकाळी ५ वाजता घरात आल्यावर घरातील कपाट तोडून सामान अस्तव्यस्त केलेले आढळून आले. कपाटातील सोन्याचे दागीने चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content