सावदा प्रतिनिधी । शहरातील शारदा चौकातील एका संशयित रूग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सावद्यात एकुण रूग्ण संख्या दहा वर पोहचली आहे. यातील पाच जणांचा मृत्यू तर पाच जणांवर सावदा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
सावदा शहरात गेल्या पंधरवाड्यात ९ कोरोनाबाधित रूग्ण आढळूल आले. यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. संशयित म्हणून असलेल्या शहरातील शारदा चौकातील एक रूग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह असल्याचा आज सावदा प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानुसार शारदा चौक परिसर सील करण्यासाठी सावदा पालिका, आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणा दाखल झाली आहे. दरम्यान आज आढळून आलेल्या कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कातील १० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या वृत्ताला मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.