Home आरोग्य संबित पात्रा रुग्णालयात दाखल ; कोरोनाची लक्षणं दिसली

संबित पात्रा रुग्णालयात दाखल ; कोरोनाची लक्षणं दिसली

0
35

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांच्या शरीरात कोविड १९ ची लक्षणे दिसल्याने त्यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

 

 

मर उजाला या वेबपोर्टलने आपल्या दिलेल्या वृत्तात म्हटलेय की, संबित पात्रा यांना रुग्णालयात भरती केले असून त्यांची कोरोना चाचणी घेण्यात येणार असल्याचे समजते. सध्या, ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, वृत्तवाहिन्यांमधील चर्चासत्रातून आणि आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सातत्याने भाजपाची बाजू मांडणारे व काँग्रेसविरोधी भूमिका घेण्यासाठी संबित पात्रा प्रसिद्ध आहेत. पात्रा यांनी एक तासापूर्वीच भाजपा नेते भुपेंद्र यादव यांच्या पत्रकार परिषदेचे ट्विट रिट्विट केले आहे.


Protected Content

Play sound