Home आरोग्य चिंताजनक: जिल्ह्यात सात कोरोनाबाधित रूग्ण आढळले

चिंताजनक: जिल्ह्यात सात कोरोनाबाधित रूग्ण आढळले

0
39

जळगाव प्रतिनिधी – जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून संशयित कोराना रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी सात जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४८२ वर पोहचला आहे.

जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. हे सर्व अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये बोरोलेवाडी, सावदा येथील एक, विटनेर येथील दोन, भुसावळ येथील दोन, कोरपावली, ता. यावल येथील एक, शाहूनगर, जळगाव येथील एक याप्रमाणे एकूण सात व्यक्तींचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ४८२ इतकी झाली आहे.


Protected Content

Play sound