पियुष होमिओपॅथी क्लिनीकतर्फे आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचे वाटप

चोपडा प्रतिनिधी । कोरोनापासून वाचण्यासाठी तसेच आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य असलेल्या आर्सेनिक अलबम ३० या गोळ्यांचे वाटप पीयूष होमिओपँथिक क्लिनिक चोपडा /नाशिक चे डॉ. सुरेश. टी. पाटील यांनी मागील अनेक दिवसांपासून करत आहे

या संदर्भात पीयूष होमिओपँथिक क्लिनिकचे डॉ. सुरेश. टी. पाटील यांनी सांगितले की, होमिओपॅथिक औषधी आर्सेनिक -अल्बम ३० या औषधाचे नुकसान (साईड इफेक्ट्स) होत नाही. जगात कोणतीही गोष्ट – पदार्थ , निव्वळ चांगली किंवा वाईट असूच शकत नाही.
यामुळे ही औषधी सावधानी पूर्वक डॉक्टरकडून घेतल्यास त्याचा लाभच होतो. नुकसान होणार असेल तर तशी सूचना अथवा कल्पना दिली जाते. माझ्या स्वतःच्या ४० वर्ष प्रॅक्टिस मधून हा वैयक्तिक अनुभव आहे. होमिओपॅथिक औषधी देतांना शास्र,अनं कलेची सांगड घालावी लागते. काही डॉक्टर मंडळी होमिओपॅथिक औषधा बाबतीत शंका उपस्थित करतात हे त्यांच्या जागी हे कदाचित खरे असावे. राहिला प्रश्‍न प्रतिकार शक्ती वाढवणारे औषधाचा.. प्रमुख मुद्दा प्रत्येकाच्या प्रतिकार शक्ती , सवयी, आवडीनिवडी, प्रकृती, इ. नुसार औषधी दिली असेल तर प्रतिकार शक्ती १००% वाढू शकते…त्या करिता अभ्यासू /अनुभवी डॉक्टरांच्या सल्यानेच कुठलेही होमिओपॅथिक औषधी घेऊ शकतात.

या संदर्भात कुणाला काही शंका असल्यास आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे. तर त्यांच्या या उपक्रमाचे चोपडा शहरातून कौतुक होत आहे.

Protected Content