Home क्राईम यशवंत कॉलनीत भरदिवसा घरफोडी; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा

यशवंत कॉलनीत भरदिवसा घरफोडी; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा

0
41

जळगाव प्रतिनिधी । किराणा सामान घेण्यासाठी गेल्याचे पाहून भरदुपारी अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून घरातील चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, सुभाष नारायण कोल्हे (वय-४१) रा. यशवंत कॉलनी, रिंगरोड येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शनिवारचा बाजार असल्याने बाजार बाजार करण्यासाठी कोल्हे दाम्पत २३ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून घराबाहेर पडले.

कुलूपबंद घर चोरट्यानी हेरल्यानंतर अज्ञात चोरट्यानी बंद दरवाजाचा कडी कोयडा तोडून घरात प्रवेश केलाकपटाचे कुलुप तोडल्यानंतर त्यातील सामान अस्तवस्त करून किंमती मुद्देमालाचा शोध घेतला. चांदीचे निरंजन, चांदीचे पायल व अन्य वस्तू, रोख रक्कम असा एकूण असा ५ हजाराचा ऐवज घेत चोरटे पसार झाले. दुपारी ३.३० वाजता दाम्पत्य घरी आले असता चोरीचा प्रकार समोर आला. सुभाष कोल्हे यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास रवींद्र तायडे करीत आहेत.


Protected Content

Play sound