यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध उपायोजना करण्यात येत आहे. तालुक्यातील साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहीकेच्या चालकास पीपीई कीट वाटप करण्यात आले.
साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहीका चालक ऑन ड्यूटी २४ तास आरोग्य सेवेसाठी तत्पर असतात. प्राथमिक आरोग्य केंद्रातील साखळी परिसरातील असलेल्या कुठल्याही गावातून रुग्णवाहिकासाठी फोन केल्यावर तत्पर सेवेत हजर राहात असल्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजाराचे प्रादुर्भाव होऊ नये यासाठी साखळी प्राथमिक आरोग्य केंद्राला कार्यरत असलेले रुग्णवाहिका वाहन चालक शोयब शेख शकील याला वैद्यकीय अधिकारी स्वॉती कवडीवाले यांच्याहस्ते पीपीई कीट देण्यात आले.
यावेळी आरोग्य सेवक के.पी.तायडे, आरोग्य सहाय्यक संजय पारधी, शेख सल्लाउद्दिन मनिषा कोळी, श्रीमती पाचंपांडे, एस.डी.आहिरराव, एस.एस.पाटील, व्हि.बी.चोपडे आदी उपस्थित होते.