Home आरोग्य धरणगावात पुन्हा एक कोरोना बाधीत; शहरातील रूग्णांची संख्या १०

धरणगावात पुन्हा एक कोरोना बाधीत; शहरातील रूग्णांची संख्या १०

0
52


धरणगाव प्रतिनिधी । आज रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टमध्ये शहरात एक रूग्ण कोराना बाधीत असल्याचे निष्पन्न झाल्याने शहरातील रूग्णांची संख्या दहावर पोहचली असून या वृत्ताला वृत्ताला प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दुजोरा दिला आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरात आता कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात पसरल्याचे दिसून येत आहे. आधी खत्री गल्लीतील एक महिला कोरोना पॉझिटीव्ह आढळून आली होती. तिच्या संपर्कात आलेल्या आठ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून आज या सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे लहान माळीवाडा परिसरातील दोन जणांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी स्वत:हून स्वॅब सँपल देऊन तपासणी केली. यातील एक जण पॉझिटीव्ह आला असून एकाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे.

संबंधीत पॉझिटीव्ह रूग्ण हा देखील लहान माळीवाडा परिसरातील रहिवासी असून त्याच्या संपर्कात आलेल्या आठ जणांना रात्रीच क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. यामुळे आता धरणगावातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या दहावर गेली आहे. तर शहरात अजून एक पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याच्या वृत्ताला प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दुजोरा दिला आहे.


Protected Content

Play sound