तृतीयपंथियांच्या भावना दुखावल्या : निलेश राणेंच्या विरोधात फैजपुरात दावा

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । ट्विटरवरून तृतीयपंथियांचा अवमानकारक उल्लेख केल्यामुळे भाजप नेते निलेश राणे यांच्या विरोधात येथे अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, निलेश नारायण राणे यांनी तृतीयपंथियांचा अतिशय अवमानकारक उल्लेख केल्याने ते वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. गेल्या काही दिवसापासून निलेश राणे व त्यांच्या विरोधी असलेले रोहित पवार व तनपुरे यांच्यात चालत असलेल्या सोशल मीडियावरील राजकीय वाकयुध्द शिगेला पोहचले आहे. यात दिनांक १९ मे २०१९ रोजी सायंकाळी ०७:३९ च्या दरम्यान आपल्या ट्विटर अकाउंट वरून राणे यांनी तृतीयपंथियांच्या समुदायाचा उपहासात्मक पद्धतीने वापर करत समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत.
तृतीयपंथी समुदाय जो के स्वतःची सांस्कृतिक व सामाजिक ओळख ठेवून आहे व त्याच्या संघर्ष विषयी कुठलीही जाणिव नसलेले व लोकप्रतिनिधी म्हणून राहिलेले, निलेश नारायण राणे यांनी संवेदनशीलता न दाखवता बेताल वक्तव्य करणे. हे अशोभनीय व या समुदायाच्या अस्मितेला ठेच पोहोचविणारे आहे.

नालसा च्या २०१४च्या दीर्घ हवाला अंती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने केंद्र व राज्य सरकारी यांनी तृतीय पंथी अर्थात सांस्कृतिक ओळख हिजडा असलेल्या व्यक्ती वा समुदायाला कायदेशीर अधिकृत अशी लिंग म्हणून तृतीयपंथी मान्यता दिलेली आहे. कुठल्याही लिंग जातीधर्माचा उपरोधिक वा अवमानकारक त्याच्या अस्मितेला ठेच पोहोचविणारा व सामाजिक कृती पोहोचविणे अपराधच आहे. या अनुषंगाने निलेश नारायण राणे यांनी भारतीय दंड विधान इफॉर्मेशन अ‍ॅक्ट ४९९, २०१ प्रमाणे अशा पद्धतीचा मानहानीकारक वक्तव्य करत हिणावणे याविरोधात शमिभा पाटील( तृतीयपंथी समुदाय प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ता) फैजपूर यांचेवतीने फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

Protected Content