धक्कादायक : कोरोना बाधीताच्या अंत्ययात्रेला गेलेले १४ जण बाधीत !

भडगाव प्रतिनिधी । येथे ११ मे रोजी मृत झालेल्या कोरोना बाधीत वृध्दाच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेले १४ जण बाधीत झाल्याची धक्कादायक माहिती रात्री उशीरा समोर आली आहे.

रविवारी रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टमध्ये १५ जण कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील १४ जण हे भडगावातील आहेत. हे सर्व जण एका वृध्दाच्या अंत्ययात्रेत सहभागी झाल्याची माहिती मिळाली आहे. हा वृध्द ११ मे रोजी मृत पावला होता. याचे स्वॅब सँपल हे पॉझिटीव्ह असल्याचे नंतर निष्पन्न झाले होते. यामुळे प्रशासानाने संबंधीत वृध्दाचे कुटुंबिय तसेच त्यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित असणार्‍यांचे स्वॅब सँपल घेऊन त्याला तपासणीसाठी पाठविले होते. या सर्वांचे अहवाल रविवारी रात्री उशीरा प्राप्त झाले असून यातील १४ जण हे कोरोना बाधीत असल्याचे सिध्द झाले आहे. तर अजून एक रूग्ण बाधीत असून त्याच्या पत्त्याबाबत प्रशासनाला माहिती मिळालेली नव्हती.

कोरोनामुळे मरण पावलेल्या त्या वृध्दाच्या अंत्ययात्रेला उपस्थित असणारे पाच जण आधीच कोरोनाने बाधीत झाल्याचे दिसून आले आहे. आता या पाठोपाठ १४ जण बाधीत असल्याचे स्पष्ट झाल्याने भडगावातील कोरोनाचा प्रकोप वाढल्याचे अधोरेखीत झाले आहे.

Protected Content