जळगाव प्रतिनिधी । भुसावळात कोरोनाचा प्रकोप वाढला असतांना आज आलेले सर्वच्या सर्व म्हणजे ६५ अहवाल निगेटीव्ह आल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.
याबाबत वृत्त असे की, भुसावळ शहरात कोरोनाचा प्रकोप प्रचंड प्रमाणात वाढीस लागला आहे. शहरात आजवर कोरोना बाधीत ४१ रूग्ण आढळून आले असून यात दररोज भर पडतच आहे. या पार्श्वभूमिवर, जिल्हा माहिती कार्यालयाने आज सकाळी जाहीर केलेल्या अपडेटमध्ये भुसावळातील स्वॅब घेतलेल्या ६५ लोकांचे अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व जण कोरोना पॉझिटीव्हच्या संपर्कात आलेले होते. तसेच यात काही नगरपालिका कर्मचार्यांचाही समावेश होता. यामुळे भुसावळातील आरोग्य यंत्रणांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.



