Home आरोग्य एका दिवसात तब्बल ६० पोलिसांना कोरोनाची लागण

एका दिवसात तब्बल ६० पोलिसांना कोरोनाची लागण


मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात आज एका दिवसात तब्बल ६० पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता १०६१ वर पोहोचली आहे.

 

आज एका दिवसात ६० पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर काल एका दिवसात ७६ पोलिसांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १ हजार ०६१ वर पोहोचली आहे. यात ११२ अधिकारी आणि ९४९ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ९० अधिकारी आणि ७८८ पोलीस कर्मचारी अशा एकूण ८७८ पोलिसांत लक्षण दिसून येत आहेत. तर २२ अधिकारी आणि १५२ पोलीस कर्मचारी असे एकूण १७४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुर्देवाने ९ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.


Protected Content

Play sound