पहूर (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून मुख्य रस्त्यावरील गटारीचा ढापा अपुणावस्थेत तुटून पडलेला होता. सरपंच व उपसरपंच यांनी लक्ष देवून पहूर पेठेतील संतोषी मातानगरातील गटार व ढाप्याचे काम पुर्ण करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर पेठ येथील संतोषीमातानगरचा मेन रस्त्यावरील ढापा खराब होऊन अर्धा ढापा तुटला असल्याने राहिलेला अर्धा काहींनी कायदा हातात घेऊन तोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पत्रकारांनी आक्षेप घेतल्याने व पहूर पेठ ग्रामपंचायतीचे सरपंचपती रामेश्वर पाटील व उपसरपंच श्याम सावळे यांनी वेळेचे भान ठेवून तात्काळ दखल घेऊन पहूर पेठ ग्रामपंचायतीने येथील संतोषीमातानगर कडे जाणाऱ्या मेन रस्त्यावरील गटार व ढाप्याचे काम पूर्ण झाले असून संतोषीमातानगर येथील जनतेने पत्रकारांनी केलेल्या सहकार्यामुळेच व ग्रामपंचायतीने दखल घेऊन मेन रस्त्यावरील गटारीचे व ढाप्याचे काम पूर्ण झाल्याबद्दल आभार मानले.