४७ संशयितांच्या कोरोनाची चाचणी निगेटीव्ह

जळगाव प्रतिनिधी । एकीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतांना रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टमध्ये सर्वच्या सर्व ४७ स्वॅब सँपलची चाचणी निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणांना दिलासा मिळाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २००च्या पार गेली असून यातील सर्वात जास्त रूग्ण हे अमळनेरचे आहेत. यानंतर भुसावळ, जळगाव, पाचोरा, चोपडा, भडगाव आदी तालुक्यांमध्येही याचा संसर्ग पसरल्याचे स्पष्ट झालेले आहे. काल दिवसभरात एकूण १७ नवीन कोरोना बाधीत आढळून आले. या पार्श्‍वभूमिवर, रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टमधील सर्वच्या सर्व ४७ स्वॅब सँपल्स हे निगेटीव्ह आले आहेत. हे सर्व संशयित भुसावळ, जळगाव, चोपडा, जामनेर व रावेर तालुक्यांमधील आहेत. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात निगेटीव्ह रूग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Protected Content