भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील वेल्हाळा येथील तलावातील माती आणि मुरूम काढून तो सध्या सुरू असणार्या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी वापरण्याची मागणी तेथील सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे.
मागील वर्षाप्रमाणे या वर्षीसुद्धा वेल्हाळे तलावातील पाणी साठा फक्त दहा ते पाच टक्के शिल्लक असून तलावाचे ७०% जलक्षेत्र हे कोरडे झाले असून त्यातील महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी उड्डाण पुलांच्या भरावासाठी तलावातील मुरूम वापरता येऊ शकतो. त्यामुळे तलावाची खोली आठ ते दहा फुटाने वाढून लाखो क्युबिक मीटर जलसाठा तलावांमध्ये येणार्या काळात राहू शकतो. मुबलक जलसाठा तलावात राहिल्याने परिसरातील शेतकर्यांना व आजूबाजूंच्या सहा ते सात गावांना तलावाजवळ जवळील विहिरीवरून पाणीपुरवठा केला जातो. तलावातील जल क्षेत्राचे खोलीकरण झाल्यास येणार्या काळात तलावात बारमाही पुरेल एवढा जलसाठा शिल्लक राहू शकतो. यामुळे वेल्हाळे तलावातील माती व मुरूम महामार्ग चौपदरीकरणाच्या भरावात वापरण्यात येऊन तलावाचे खोलीकरण करण्याची मागणी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, सरपंच सौ सीमा विजय पाटील तसेच गावकर्यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, स्आमदार संजय सावकारे व जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केली आहे.