पाचोरा प्रतिनिधी । शहरातील कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढत असल्याने गंभीर वातावरण निर्माण झाले असतांना एक दिलासा देणारी वार्ता मिळाली आहे. दोन रूग्ण निगेटीव्ह होवून परतले असल्याने त्यांच्या कुटुंबात आनंद पसरला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील स्टेट बँक परिसरातील एका कुटुंबातील वयोवृद्ध कोरोना पॉझिटिव्हमुळे निधन झाले. त्यांच्या परिवारांत दोन पॉझिटिव्ह आणि इतर निगेटिव्ह होते. जे दोन पॉझिटिव्ह होते त्यात एक ७५ वर्षीय वृध्दा वयाच्या होत्या. त्यांच्यासह त्यांचे नातेवाईक ४२ वर्षाचे असून ठणठणीत आहेत. आज त्यांची सुटका करण्यात आली आहे. सुटका झालेल्या वृध्दाने सांगितले ‘कोरोनाला अजिबात घाबरू नका, त्याच्याशी लढा द्यावा आणि समर्थपणे हिंमत न खचता या संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करावा, असे सांगून जिवनात असे काही घटना घडतच असतात त्यास निर्धास्तपणे सामोरे जावे असे सांगितल्याने कुटुंबाची व चाहत्याची हिंमत वाढल आहे. परिसरातील काही नागरीकांनी त्या वृध्देची भेट घेवून व फुलाचे बुके घेवून सुयश चिंतले आहे. आणि नैतिक पाठवळ दिले.