जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून आज सायंकाळपर्यंत १२५ बाधीत रूग्ण असल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे. यातील चिंताजनक पैलू हा या विषाणूचा ग्रामीण भागातील संसर्ग वाढत चालल्याचा असून यामुळे ग्रामस्थांनी लॉकडाऊनच्या नियमांचे कडक पालन करण्याची आवश्यकता अधोरेखीत झाली आहे.
जळगाव जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एक प्रेस नोट जारी केली. यानुसार- जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव, भुसावळ, रावेर, जामनेर येथे स्वॅब घेतलेल्या 170 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज दिवसभरात प्राप्त झाले आहे. यापैकी 145 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून पंचवीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेले रूग्णांमध्ये भुसावळ येथील पाच, चोपडा येथील दोन, अमळनेर येथील सोळा तर मेहरूण व जळगाव येथील दोन रूग्ण असे एकूण पंचवीस रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 125 इतकी झाली असून त्यापैकी अठरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हा माहिती कार्यालयातर्फे दिलेल्या माहितीत एक पॉझिटीव्ह रूग्ण हा ममुराबाद येथील असल्याची माहिती पहिल्यांदा समोर आल्याने खळबळ उडाली होती. याबाबत चौकशी केली असता पॉझिटीव्ह नव्हे तर त्याला रूग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केलेला तरूण हा ममुराबादचा असल्याची माहिती समोर आली.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००