Home Cities अमळनेर महेश माळी यांना उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान

महेश माळी यांना उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान

0
44


अमळनेर प्रतिनिधी । येथील पी.बी.ए. इंग्रजी मेडियमचे क्रीडा शिक्षक महेश माळी यांना नुकताच तालुकास्तरीय उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आमदार स्मिता वाघ व भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या हस्ते महेश माळी यांना हा पुरस्कार देण्यात आला. महेश माळी हे गेल्या काही वर्षापासून क्रीडा शिक्षक म्हणून उत्कृष्ट कामगिरी करून विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत नैपुण्य मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना सहपत्नीक मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह ,सन्मानपत्र, शाल देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या यशाचे अभिनंदन माळी समाजाचे अध्यक्ष दिलीप पाटील उपाध्यक्ष दिनेश माळी, सचिव गोकुळ बागुल ,उदय खैरनार, अँड सुरेश सोनवणे बाळासाहेब महाजन, ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्‍वर महाजन, साहित्यिक गं.का. सोनवणे ,प्रा.नगराज माळी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष अमोल माळी , महात्मा फुले युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण महाजन, क्रीडा समितीचे तालुकाध्यक्ष एस.पी वाघ , माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, डी.डी राजपूत, निलेश विसपुते यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound