Home राष्ट्रीय झारखंडमधील चकमकीत दोन नक्षलवादी ठार

झारखंडमधील चकमकीत दोन नक्षलवादी ठार

0
32


रांची वृत्तसंस्था । झारखंडमधील गुमला येथे आज पहाटे सुरक्षा दलांनी दोन नक्षलवाद्यांना ठार केले असून दोन एके-४७ रायफल्स जप्त केल्या आहेत.

गुमलामधील कामडारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही नक्षलवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या अनुषंगाने त्यांना घेरून नक्षलवाद्यांना शरण येण्यास सांगितले. मात्र, या आवाहनाला न जुमानता नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यावर प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाच्या जवानांनीही गोळीबार केला. यात दोन नक्षलवादी मारले गेले. या परिसरात सुरक्षा दलाकडून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. या चकमकीच्या ठिकाणाहून दोन एके ४७ रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound