Home Cities जामनेर गिरीश महाजन यांना होम क्वारंटाईन करा- राष्ट्रवादीची मागणी

गिरीश महाजन यांना होम क्वारंटाईन करा- राष्ट्रवादीची मागणी

0
43

जामनेर प्रतिनिधी । माजी मंत्री तथा विद्यमान आमदार गिरीश महाजन हे गत काही दिवसांमध्ये मुंबई येथे गेले असल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात यावे अशी मागणी तालुका राष्ट्रवादीने एका निवेदनाद्वारे केली आहे.

राष्ट्रवादीचे जामनेर शहराध्यक्ष जितेश उर्फ पप्पू रमेश पाटील यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून आ. गिरीश महाजन यांची वैद्यकीय चाचणी करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात नमूद केले आहे की, आ. गिरीश महाजन हे गेल्या सात दिवसांपासून मुंबई येथे होते. ते सध्या जामनेर येथे आलेले आहेत. मुंबईत कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात झाला असून यामुळे शासकीय नियमानुसार आ. महाजन यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना १४ दिवसांसाठी होम क्वॉरंटाईन करण्यात यावे. गिरीश महाजन हे राहत असलेला परिसर हा दाट लोकवस्तीचा असल्याने आमदार महोदयांनी स्वत: चाचणीसाठी पुढाकार करण्याचे आवाहन देखील या निवेदनात करण्यात आले आहे.

जितेश उर्फ पप्पू रमेश पाटील यांनी तहसीलदार, पोलीस निरिक्षक आणि तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना हे निवेदन दिलेले असून यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

ncp nivedan

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००


Protected Content

Play sound