Home क्राईम खादगाव येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

खादगाव येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या


जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील खादगाव येथील १९ वर्षीय तरूणाने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची‍ घटना आज सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी जामनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील खादगाव येथील शुभम सुनिल सुर्यवंशी (वय-१९) या तरूणाने घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी जामनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound