लॉकडाऊनच्या काळात दलित आणि गरिबांची उपेक्षा ; मायावतींचा भाजपा सरकारवर हल्लाबोल

लखनऊ (वृत्तसंस्था) देशभरात लागू असलेला लॉकडाऊनच्या काळात दलित आणि गरिबांची उपेक्षा करण्यात आली आहे. सरकारांनी त्यांच्यासाठी कोणतीही वेगळी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे ते लोक आपापल्या घराकडे पलायन करत आहेत, असा हल्लाबोल पार्श्वभूमी बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी भाजपा सरकारवर केला आहे.

डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या १२९व्या जयंतीनिमित्त मायावतींनी उत्तर प्रदेशच्या जनतेला संबोधित केले. मायावती म्हणाल्या की, लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे प्रचंड हाल झाले होते. लॉकडाऊनदरम्यान देशभरात दलित आणि मागास वर्गातील लोकांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळेच देशातील अनेक भागातील लोक पलायन करत आहेत. पलायन करणाऱ्यांमध्ये ९० टक्के लोक हे दलित आणि अतिमागास प्रवर्गातील आहेत, याचा उल्लेखही मायावतींनी केला आहे. राज्य सरकारांकडून दलित आणि गरिबांची उपेक्षा करण्यात आली आहे. सरकारांनी त्यांच्यासाठी कोणतीही वेगळी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे ते लोक आपापल्या घराकडे पलायन करत असल्याचेही मायावती म्हणाल्या.

Protected Content