रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील सावदा शहरातील साळीबाग येथील रास्त भाव दुकानास तहसिलदार रावेर व पुरवठा निरीक्षक रावेर यांनी तलाठी गाते व कोतवाल सावदा यांनी बुधवार ८ एप्रिल रोजी भेट दिली असता दुकानदाराने धान्यसाठा अयोग्य पद्धतीने विल्हेवाट लावल्याचे आढळून आल्याने त्याच्याविरोधात सावदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द केले आहे.
सावदा शहरातील साळीबाग येथील रास्त भाव दुकानदार भुषण सुधाकर सुरवाडकर यांच्या दुकानांत रावेर तहसीलदार व रावेर पुरवठा निरीक्षक यांनी तलाठी गाते व सावदा कोतवाल यांनी बु धवार ८ एप्रिल रोजी धान्य वाटप सुरु असतांना तपासणी केली असता शासनामार्फत मिळालेल्या धान्याची अयोग्य मार्गे विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न झाले. यात शिधापत्रिकाधारकांचे आर.सी. क्र. पाडळातून व प्रत्यक्ष विचारपुस करुन तपासणी केली असता तेथे १५ कट्टे असा ऐकूण ७.६० क्विंटल गहू व ५ कट्टे असा २.५५ क्विंटल तांदुळ व ३० किलो ज्वारी असा धान्य साठा आढळून आला. त्याची पडताळणी कार्यालयातुन देण्यात आलेले परमीट स्टॉक रजिस्टर व ऑनलाईन प्रणाली वरील स्टॉक व ऑनलाईन प्रणाली वरील सेल रजिस्टर याचेशी केली असता त्यात तफावत आढळून आली. धान्य साठयाची मोजमाप झाल्यानंतर धान्य दुकान हे भुषण सुधाकर सुरवाडकर यांच्या रहाते घरातच असल्यामुळे सर्व धान्य एका बाजूला लावण्यात आले. यावरुन शासनाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्धारित केलेल्या अटी व शर्तीचे उल्लघन केल्याचे दिसून आल्याने रास्त भाव दुकानदार भुषण सुरवाडकर यांनी धान्य वितरणात केलेल्या गैरप्रकाराबाबत मंडळ अधिकारी उटखेडा यांनी पो.स्टे. सावदा येथे एफ. आय. आर. दाखल केली आहे. स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिले आहेत.