कळमोदा येथे ग्रामस्थांना कोरोना संदर्भात जनजागृती

फैजपूर प्रतिनिधी । यावल तालुक्यातील कळमोदा येथे कोरोनासाठी नेमलेल्या समितीच्या बैठकीत कोरोना जनजागृती करून कोरोनापासून आपला कसा बचाव करता येईल यासाठी मार्गदर्शन केले.

कोरोनासाठी नेमलेल्या समितीच्या बैठकीत सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी, कोतवाल, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी बाहेरगावाहून आलेल्या नगरीकांना कोरोना आजाराची लक्षणे दिसल्यानंतर त्यांना भेटून जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र खिरोदा येथे तपासणी करून घ्यावी अशी सुचना दिल्यात. इतर लोकांना कामाशिवाय घराबाहेर निघू नका अशी जनजागृती केली. गावात कोरोना आजारासंदर्भात पुन्हा माहिती दर दिवशी समितीची बैठक संपल्यानंतर दिली जाते. ठिकठिकाणी जे लोक एकत्रित सतात त्याठिकाणी काळे आईल टाकले जात आहे. तसचे खबरदारी म्हणून तोंडाला मास्क किंवा रूमाला बांधणे व घराच्या बाहेर विनाकारण निघू नये, कोठेही गर्दी करू नये, सोशल डिस्टनिंग पाळावे असे आवाहन केले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक वाघ यांनी कळमोदा गावाला भेट देवून कोरोना आजाराबाबद माहिती देत जनजागृती केली आहे.

Protected Content