Home आरोग्य चिंताजनक : पुण्यात दिवसभरात तिघांचा मृत्यू !

चिंताजनक : पुण्यात दिवसभरात तिघांचा मृत्यू !


पुणे (वृत्तसंस्था) पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात तीन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा एकूण आकडा आता २१वर पोहोचला आहे.

 

महाराष्ट्रातल्या करोना बाधितांची संख्या गुरुवारी १२९७ वर पोहचली आहे. एका दिवसात महाराष्ट्रामध्ये १६२ नवे रुग्ण आढळून आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्याचा मृत्यूदर वाढला असून सहा टक्क्यांवर आला आहे. आज सकाळी पुणे जिल्ह्यात दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. यांपैकी एक जण बारामतीतील तर दुसरा पुणे महापालिका हद्दीतील होता. आजवर पुणे शहरात १६८, पिंपरी चिंचवड २२, ग्रामीण १४ अशी एकूण २०४ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.


Protected Content

Play sound