”उध्दवा एक सांगायचं होतं बेटा”….सिंधूताई व मुख्यमंत्र्यांचा संवाद ‘व्हायरल’ !

मुंबई प्रतिनिधी । अनाथांची माता सिंधूताई सपकाळ यांनी आज दुपारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत दूरध्वनीवरून साधलेला संवाद सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात भावनेला ओथंबलेल्या आवाजात माई यांनी मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर महाराष्ट्र उभा असल्याचे वक्तव्य केले आहे.

अनाथांची माता सिंधूताई सपकाळ यांनी आज कोरोनाबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. हा संवाद आता सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. आपल्यासाठी हा संवाद जसाचा तसा सादर करत आहोत.

उद्धव ठाकरे आणि सिंधुताई सपकाळ यांच्यात झालेला संवाद

उद्धव ठाकरे : हॅलो..

माई : हॅलो..

उद्धव ठाकरे : हां उद्धव बोलतो आहे, सिंधुताई नमस्कार

माई : बाळा बोल बोल..बेटा..बाळासाहेबांच्या पिल्ल्या बोल..

उद्धव ठाकरे: हं..हो.. काहीनाही मला कुणतरी तो व्हॉट्स अॅप एक पाठवला आपले आशीर्वाद मिळाले.

माई : बाबा केवढी कसोटी आहे लेकरा… केवढी कसोटी आहे..

उद्धव ठाकरे : अहो माई तुम्ही तर आयुष्यभर कसोटी सहन करत आहात..

माई : अरे पण त्या कसोटीला धीराने तोंड देतोस तू.. खरंच. बाळासाहेबांचं रक्त..समर्थपणे पुढे चालला आहेस

उद्धव ठाकरे: मग…मागे नाही हटणार मी. मागे हटणार नाही.

माई : नाही रे.. तू मागे हटणार नाहीस

माई : उद्धवा आणि सांगायचं होतं बेटा.. एवढा सिंपल मुख्यमंत्री कुठेही बदल नाही तुझ्यात..पावलं उचलताना वाटलं नव्हतं तू एवढा खंबीर होशील म्हणून..

उद्धव ठाकरे : अहो मुख्यमंत्रीपद वेगळं काय असतं? आपण आहोत तसं रहावं.

माई: खरं रे खरं..महाराष्ट्राचं रक्त इतकं खंबीर असू शकतं..केवढी आव्हानं रे तुझ्यासमोर लेकरा..बाळा.. केवढी आव्हानं तुझ्यासमोर.

उद्धव ठाकरे : पार पाडणार..तुमच्या आशीर्वाद आहेत ना मग बस..

माई : अरे बाबा आहे रे आहेत..काय रे पिल्ला आशीर्वाद आहेतच कायमच

उद्धव ठाकरे : तुम्ही पण काळजी घ्या..बाहेर जाऊ नका.

माई : तू पण बेटा, जगाची काळजी तुझ्यावर आहे आता. महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे बाळ तू पण काळजी घे बेटा

उद्धव ठाकरे: काळजी घ्या..

माई : हां हे सगळं निवळल्यावर मी येऊन जाईन बेटा

उद्धव ठाकरे : या या अवश्य या.

माई : हो रे बेटा.. पण सांभाळ, काळजी घे पिल्ला काळजी घे. मीनाताईचं दूध आहे तुझ्यात काही हरणार नाहीस तू.

उद्धव ठाकरे : हो माई..

माई : अच्छा बेटा.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content