Home आरोग्य चिंताजनक : अवघ्या १२ तासांत २४० नवे रुग्ण आढळले !

चिंताजनक : अवघ्या १२ तासांत २४० नवे रुग्ण आढळले !


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या १२ तासांत तासांत २४० नवे रुग्ण समोर आले आहेत. यानुसार आता देशात एकूण कोरोना बाधितांची संख्या १६३७ वर पोहोचली आहे.

 

केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत देशात गेल्या १२ तासांत तासांत २४० नवे रुग्ण समोर आले आहेत. या १६३७ जणांपैकी १४६६ जणांवर देशातील वेगवेगळ्या रुग्णांलयांत उपचार सरू आहे. तर १३२ लोकं बरे होऊन घरी गेले आहेत. तर ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात सर्वाधिक कोरोनाव्हायरसचे 302 रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. यापैकी 9 जणांचा मृत्यू झाला आहे.


Protected Content

Play sound