पारोळा, प्रतिनिधी । बाजारपेठेत होणारी गर्दी टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासन नवनवे उपाययोजना ही करत आहे. आजपासून बाजारपेठेत होणारे लिलाव हे चक्क एन इ एस हास्कूलच्या मैदानावर करण्यास सुरुवात झाली आहे. संचारबंदी काळापर्यंत याच ठिकाणी रोज लिलाव होतील. अशी माहिती मुख्यधिकारी विजयकुमार मुंडे यांनी दिली आहे. दरम्यान, या भाजीपाला लिलावाकडे आडत्यांनी पाठ फिरवून अप्रत्यक्ष विरोध दर्शविला आहे.
शहराचे मुख्य बाजारपेठेत भाजीपाला लिलाव व भाजीविक्री होती. रोज सूचना करून देखील सोशल डिस्टन न ठेवता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी आडते यांचे गर्दी ही होत होती. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. या प्रकाराची नगरपालिका प्रशासनाच्यावतीने मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांनी दखल घेऊन भाजीपाला आडते यांना शुक्रवार ता. २७ मार्च रोजी. एन इ ए हास्कूलच्या मैदानावर घेऊन येत लिलाव या ठिकाणी करा अशा सूचना केली होती. परंतु, आडत्यांनी पाठिंबा न देता लिलावला पाठ देत अप्रत्यक्ष विरोध केला आहे. दरम्यान मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे हे मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिले. व आज पहाटे ६ वाजेपासून हायस्कूल मैदानावर येत कर्मचारी वतीने स्वतंत्र असे सोशल डिस्टन अंतर ठेवून शेतकऱ्यांच्या भाजीपाला विक्रीसाठी चुना मारून चौकोन आखून दिले. तसेच शहरात बाजारपेठेकडे येणारे रस्त्यावर पालिकेचे कर्मचारी उभे करून शेतकरी, रोजचे किरकोळ भाजीपाला विक्रते यांना हायस्कूलच्या मैदानावर जाण्याचा, येण्यास भाग पाडले. सकाळी सात वाजेपासून या ठिकाणी भाजीपाला लिलावस सुरुवात झाली होती. आडत्यांनी लिलावकडे पाठ दिल्याने शेवटी शेतकरी व किरकोळ विक्रते यांच्यातच मालाचा भाव ठरवून हा भाजीपाला याठिकाणी खरेदी विक्री झाला.
काटा वजन ठेवण्याची मागणी
मैदानावर भाजीपाला लिलावप्रसंगी शेतकऱ्यांकडे व किरकोळ खरेदीदारांकडे काटा वजन राहत नाही. परिणामी मालाचे वजन हे कळत नाही. शेतकरी व किरकोळ विक्रेते यांच्यात वजनावरून मतभेद निर्माण होतात. परिणामी अधिक वजन असूनही किरकोळ विक्रेते हे कमी वजन असल्याचे सांगून शेतकऱ्याचे फसवणूक करीत आहेत. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने याठिकाणी वजन काटा उपलब्ध करून द्यावा व शेतकऱ्यांची वजनाबाबत होणारी फसवणूक टाळावी अशी मागणी काही शेतकऱ्यांनी पत्रकारांशी’शी बोलताना केली आहे. या नव्या जागेचे शेतकऱ्यांनी समर्थनसह पाठिंबा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाला देखील यामुळे हायसे वाटले आहे.