बुलढाणा प्रतिनिधी । बुलढाणा जिल्हा रूग्णालयाने आज नव्याने तीन रूग्णांना घरामध्ये स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्हा रूग्णालयाने एकुण ६४ रूग्णांना घरामध्ये स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली ठेव
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून त्याला रोखण्यासाठी केंद्रशासन आणि राज्य शासनाने देशात २१ दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली. बुलढाणा जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने संशयित कोरोना संशयितांसाठी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत एकुण ६४ रूग्ण घरीच निरीक्षणाखाली दाखल आहे. २५ तारखेपर्यंत ६१ रूग्ण निरीक्षणाखाली होते. आज नवीन तीन रूग्णांना निगराणीत ठेवले आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे. अशी माहीती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.