मुक्ताईनगर नगरपंचायततर्फे निर्जंतुकीकरण फवारणीला प्रारंभ

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर नगरपंचायततर्फे शहरात निर्जंतुकीकरण फवारणीला बुधवार २५ मार्चपासून प्रारंभ करण्यात आला आहे. यात प्रथम प्रभाग क्र. १७ येथून फवारणीस सुरुवात करण्यात आली असून ही फवारणी प्रत्यक प्रभागात करण्यात येणार आहे.

मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना संसर्ग कोविड १९ विलगीकरण कक्षात मुंबई व पुणे येथून  व विदेशातून आलेल्या दोघांनी असे एकूण ११५२ लोकांनी इन्फ्रारेड स्क्रिनिंग थर्मामिटरद्वारे तपासणी केली प्रत्येकाच्या हातावर होम क्वारंटाईन ( घरातील लोकांसह कोणाच्याही संपर्कात न राहता स्वतंत्र खोलीत राहणे ) असे शिक्के मारण्यात आलेले आहेत. त्यांच्यात जरी कोरोनाचे लक्षणे दिसून आलेली नाहीत तरीही ही लक्षणे लगेच दिसून येत नसल्याने खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने या लोकांना वेगळे राहण्याचा सल्ला दिला आहे. अशात येथील मुक्ताईनगर नगरपंचायततर्फे शहरातील गटारींवर कार्बोलीक पावडर टाकण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. यात शहरातील प्रत्येक भाग निर्जंतुकीकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्या आदेशाने पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेप्रमाणे मिनी ट्रॅक्टरवर निर्जंतुकीकरण फवारणी मशीन बसवून शहरात प्रभागांनुसार फवारणी सुरू करण्यात आली आहे. प्रभाग क्र.१७ मध्ये बुधवार दि. २५ मार्चपासून ही फवारणी करण्यात येत आहे. यावेळी मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, नगराध्यक्षा नजमा तडवी, नगरसेवक राजेंद्र हिवराळे, माजी सरपंच प्रवीण पाटील, माजी उपसरपंच आसिफ बागवान व नगरपंचायत कर्मचारी सचिन काठोके ,  इतर कर्मचारी तसेच पत्रकार संदीप जोगी उपस्थित होते .

Protected Content