करोना इफेक्ट: राज्यात अनेक खासगी दवाखाने बंद

मुंबई वृत्तसंस्था । कारोनाच्या रूग्णांवर योग्य उपचार केल्यास रूग्ण बरा होऊ शकतो, संशयित रूग्ण असल्याने त्यांच्या वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू नका आणि दवाखाने बंद ठेवू नका असे आवाहन केल्यानंतरही खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले आहे. याचा त्रास सामान्य नागरीकांना होत आहे.

गोवंडी, वाशीनाका, चेंबूर या भागांमध्ये असलेल्या अनेकांना राजावाडी तसेच लो. टिळक रुग्णालयाचा जवळचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र या आपत्कालीन स्थितीत पालिका रुग्णालयांमध्ये ‘कोविड १९’ची केंद्रे तयार करण्यात आली आहे. ही वैद्यकीय सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी खासगी आरोग्यव्यवस्थेनेही मदत करावी, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.

परळ येथील डॉ. एस. एस. राव रोडवरील महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालय असून ते बंद आहे. या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी पूर्णपणे सहकार्य करण्यासाठी तयार असून, येथील ओपीडी सेवा सुरू ठेवून २०० खाटा विलगीकरणासाठी वापराव्यात, अशी विनंती कर्मचारी संघटनेचे प्रसाद लाड यांच्याकडून करण्यात आली आहे. हे रुग्णालय मध्यवर्ती भागात असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी ते सोयीचे होईल, असेही त्यांनी सांगितले.

Protected Content