Home आरोग्य धरणगाव येथे सॅनिटायझेशन टनेलचे उद्घाटन

धरणगाव येथे सॅनिटायझेशन टनेलचे उद्घाटन

0
107


धरणगाव, प्रतिनिधी । येथे श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट तर्फे सॅनिटायझेशन टनेल बसविण्यात आले. धरणगाव तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यातील टनेलचे उद्घाटन करण्यात आले.

धरणगाव तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यातील सॅनिटायझेशन टनेलचे उदघाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील व धरणगाव सिव्हिल हॉस्पीटल मधील टनेल चे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष निलेश चौधरी, चर्मकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भानुदास विसावे, माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे, प्रांताधिकारी गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे सपोनि पवन देसले तसेच जैन मंदिर ट्रष्ट चे अध्यक्ष राहुल जैन, उपाध्यक्ष प्रतीक जैन, सेक्रेटरी श्रेयान्स जैन तसेच विश्वस्त उदय डहाळे, निकेत जैन, व डॉ.मिलिंद डहाळे, प्रफुल जैन डॉ.मयूर जैन आदी उपस्थित होते


Protected Content

Play sound