Home क्राईम जळगावात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात दुकानदारांवर गुन्हा

जळगावात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात दुकानदारांवर गुन्हा

FIR


जळगाव प्रतिनिधी । शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वेगवेगळ्या दुकानाच्या ७ जणांवर एमआयडीसी पोलीसांनी कारवाई केली आहे. यासंदर्भात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यात कलम १४४ अन्वये आवश्यकतेच्या दुकाने सोडून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहे. असे असतांना एमआयडीसी हद्दीतील सात दुकानदारांवर कारवाई केली.

यांच्यावर केली कारवाई
१. हनीफ इस्माईल खाटिक (वय-५०) रा.गुलाब बाबा कॉलनी यांची बॉम्बे फुट वेअर उघडे केले.
२. रामभाऊ झिपरू जगताप (वय-६३) रा. मोहन नगर मोहाडी रोड यांनी सुलून दुकान उघडे ठेवले.
३. भुषण ज्ञानदेव सरोदे (वय-३५) रा. काशीबाई ऊखाजी कोल्ही शाळेसमोर आईस्क्रिम दुकानावर.
४. अबु बकर नशीर खान (वय-४५) रा. भवानी पेठ यांनी ऑटो मोबाईल गॅरेज सुरू ठेवले.
५. राजु रंगनाथ सुर्यवंशी (वय-३०) रा. सम्राट कॉलनी यांचे सलुन दुकान सुरू केले.
६. देवेंद्रसिंग दिलीप पाटील (वय-२२) रा. रामेश्वर कॉलनी यांनी रामेश्वर कॉलनीतील पान टपरी आणि
७. संदीप बाबुराव देशमुख (वय-२८) रा. कांचन नगर हा जळगावातील अंडा पावची गाडी उघडी ठेवतांना मिळून आला. या सर्वसातही जणांवर कारवाई करण्यात आली.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ, स.फौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, पोकॉ गोविंद पाटील, इम्रान अली सय्यद, सचिन पाटील, योगेश बारी, सचिन चौधरी, मुकेश पाटील, भुषण सोनार यांनी कारवाई केली.


Protected Content

Play sound