भडगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आज २२ मार्च रोजी भडगाव शहरासह तालुक्यात पुर्णतः बंद करून जनता कर्फ्यूला उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
येथील बाजारपेठ पाचोरा चौफुली, चाळीसगांव चौफुली, पारोळा चौफुली, मेनरोड परिसर, बस स्टॅन्ड परिसरात आज सकाळी ७ वाजल्यापासून शुकशुकाट दिसत आहे. जीवनावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने १०० टक्के बंद केलेली आहे. तर तालुक्यातील सर्व व्यापारी वर्गाने कडकडीत बंद पुकारला असून गावातील सर्वेच दुकाने, पान टपरी बंद करण्यात आले आहे. भडगांव पोलिसांकडून वारंवार आव्हान करीत आहे. सर्वच कर्मचारी आपली सेवा बजावत असतांना दिसत आहे . सर्वत्र पोलीस स्टेशनचे कौतुक करीत आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र् पोलीस कायदा कलम – ३७ (३) १३५ नुसार जमाव बंदी करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे भडगांव तहसिलदार माधुरी आंधळे व पोलीस निरिक्षक धनंजय येरूळे यांनी सांगितले.



